शिकार करून जगणारी अवलाद आहे… तुकड्यावर जगणारी नाही; शिवेंद्रराजेंचा राष्ट्रवादीवर घणाघात

सातारा |  शिकार करून जगणारी अवलाद आहे… तुकड्यावर जगणारी नाही, अशा शब्दात नुकतेच भाजपवासी झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात पोहचली. यावेळी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करत भाजपचं तोंडभरून कौतुक केलं.

साताऱ्यात महाजनादेश यात्रेचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. उदयनराजेंनी भाजपत प्रवेश केल्यावर लगोलग ते देखील महाजनादेश यात्रेत सहभागी झाले.

साताऱ्यात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवेंद्रराजेंनी मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी भाजपत प्रवेश केला, अशी टीका केली होती. त्याच टीकेला शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

तुकड्याचा खेळ आम्हाला जमतही नाही… आणि त्यावर आमचं भागतही नाही. शिकार करून जगणारी  आमची अवलाद आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीचा यथेच्छ समाचार घेतला.

दरम्यान, सातारा जिल्हा भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

महत्वाच्या बातम्या-