राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं… पक्षाने मला काय दिलं???- शिवेंद्रराजे भोसले

सातारा |  मी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रवादीत काम केलं…. त्याबदल्यात मला पक्षाला काय दिलं? त्यावेळी कोणालाच माझी आठवण व्हायची नाही. आता मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा तितपापड होतोय, असं नुकतेच भाजपवासी झालेले शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी परिपत्रक काढून त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर उत्तर दिलं आहे. 40 वर्ष राष्ट्रवादीशी प्रामाणिक राहिलेली कुटुंब पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतात? याचा विचार आणि आत्मचिंतन पक्षाने करायला हवं, असा सल्ला शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

मी पक्षाक्षी कधीही दगाफटका केला नाही. लोकसभेला पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं. आता माझी निवडणूक आहे. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो. याचा अर्थ मी पदासाठी बाहेर पडलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आमचं घराणं शब्दाला जागणारं आहे. राष्ट्रवादीत होतो तेव्हा पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आता भाजपत आहे भाजपचं प्रामाणिकपणे काम करीन, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-