‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाला नेते सोडून गेल्याची परिस्थीती पक्षाने पहिल्यांदाच पाहिली नसल्याचं शरद पवार म्हणाले.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मला भेटण्यासाठी आले होते. पक्षाच्या चौकटीबाहेर जाणार नसल्याचं शिवेंद्रराजे भोसले बोलले, असं शरद पवारांनी सांगितलं. त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षातील महत्वाचे पाच नेते त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे.

श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांचाही फोन आलेला. हे दोघेही पक्ष सोडून जाणार नाही, असा दावाही शरद पवारांनी केला आहे. 

बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होते. माढ्याचे आमदार बबन शिंदे हे मला भेटण्यासाठी येणार आहेत, अशी शरद पवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोप शरद पवारांनी भाजपवर केला आहे. 

हसन मुश्रीफ यांना भाजपात यावं यासाठी भाजपने निमंत्रण दिलं होतं मात्र त्यांनी ते स्विकारलं नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

-राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड