“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…”

मुंबई | आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले एकाच पक्षात असूनही दोघं वारंवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका केली आहे.

उदयनराजे नेहमी हवेत असतात अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली होती, त्याला उदयनराजे यांनीही त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

माझी उंची मोठी आहे, म्हणून मी हवेत असतो, तुम्हीही तेवढी उंची गाठून दाखवावी. शिवेंद्रराजेंना नेहमी टीका करण्याशिवाय काय येत नाही, त्यांनी खुशाल टीका करावी. मात्र एवढीही टीका करू नये की पोट फुटेल, असा टोला उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंना लगावला आहे.

पाची बोटं सारखी नसतात, काही लोकांचा स्वभाव प्रेमळ असतो, काही लोकांना टीका केल्याशिवाय झोप येत नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणालेत.

उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार उदयनराजे यांनी हवेतून मोटारसायकलवरून एंट्री केली होती. या त्यांच्या एन्ट्रीवर बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे यांनी सडकून टीका केली होती.

उदयनराजेंची ही एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात आहे. त्यांचं काम हे नेहमीच वाऱ्यावरच असतं जमिनीला धरून कोणतेही काम उदयनराजे करत नाहीत, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर 

“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ” 

संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा 

उत्तर कोरियात कोरोनाचे दोन रूग्ण आढळताच किम जोंगची मोठी घोषणा! 

 केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास