सातारा : राष्ट्रावादीला रामराम केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधकांना इशाराही दिला आहे.
माझा काटा काढायला कोण आलं तर ‘आरे ला का रे’ करावं लागेल. काट्याने काटा काढावाच लागेल, असा इशारा नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीत मी त्यांना कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. आपण खासदारांबरोबर चर्चा करु असं त्यांनी सांगितलं होतं. पण याची खात्री कोण घेणार, असा सवालही शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला.
समोर कोणीही येऊन उभं राहिलं तर मी भाजपमधून निवडणूक लढणार आहे, असंही शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे.
माझ्या मतदारसंघातील अंतर्गत कुरघोड्याबद्दल मी वारंवार सांगितलं होतं. पुण्याच्या बैठकीतही याची सविस्तर माहिती दिली होती. त्यांनी चर्चा करु असं सागितलं. पण नुसती चर्चा किती दिवस???, असं म्हणत त्यांनी अखेर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं.
गेली अनेक वर्षे आमचं कुटुंब पक्षाबरोबर आहे. इतक्या वर्षांनंतर एखाद्या घराण्याला असा पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचा विचार पक्षप्रमुखाने करायला हवा, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले
…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!
-विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ
-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!
-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”