सोलापूर | हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा, अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर आणि धाराशिवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा- निष्ठावंत शिवसैनिक, अशा आशयाचे बॅनर सोलापूरमध्ये लावण्यात आले आहेत. यात तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करण्यात आला आहे.
मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. यामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या उद्योगाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तानाजी सावंत अनुपस्थितीत होते.
महत्वाच्या बातम्या-
“आता पर्याय नाही, आयुष्यात पहिल्यांदा उपोषणाला बसतोय” – https://t.co/RT8rkjWdgG @YuvrajSambhaji @bjp
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
‘मी सुद्धा काही व्हर्जिन नाही’; पतीबद्दलच्या प्रश्नावर नेहाचं उत्तर – https://t.co/zaCFO8ICyl @nehhapendse_
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांसह ११ जणांवर गुन्हा दाखल – https://t.co/0RM9kvuFIO #pune
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020