मुंबई | शिवसेनेचे धुळ्यातील उपमहानगरप्रमुख निष्ठावान शिवसैनिकाने शहरातील झाशी राणी चौकात मोठे बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेब, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातुन होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरवर्षी आषाढी एकादशिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. त्यामुळे यंदाही विठुरायाची आरती ही शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते होईल. याची खात्री असल्यानेच शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख असलेले प्रविण साळवे यांनी हे जाहीरपणे मांडत हे बॅनर झळकवले आहेत.
शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रविण साळवे यांनी या पोस्टर जवळ येवून बंडखोर झालेल्या शिवसेना आमदारांचा निषेध केला. यावेळी उध्दव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. असं म्हणतानाच पक्षात फितुरी करणाऱ्या मंत्री एकनाथ शिंदे यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला.
शिवसेना ही फिनिक्स पक्षासारखी राखेतुन पुन्हा उभी रहाणारी संघटना आहे. एका दुसऱ्याच्या जाण्याने या संघटनेत काहीही फरक पडत नाही. मात्र सच्चा शिवसैनिक गद्दारांना कधी माफ करीत नाही, असं ते म्हणाले.
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले असले तरी सरकारला धोका नाही, असा ठाम विश्वास निष्ठावान शिवसैनिकांचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात
“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”