बीड | शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी वैर घेणं चांगलंच महागात पडलेलं दिसतंय. कारण, शिवसंग्रामचा उरलेला एक जिल्हा परिषद सदस्यही आता भाजपात गेलाय. यापूर्वी तीन जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसंग्रामची साथ सोडली होती. शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत पंकजा मुडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसंग्रामचे चार सदस्य निवडून आले होते. भाजपने युती करत शिवसंग्रामकडे जिल्हा परिषद उपाध्यक्षपद दिलं. मात्र यापूर्वीच शिवसंग्रामचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के यांचे पती राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्रामला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला होता.
राजेंद्र मस्के यांची भाजपशी जवळीक पाहता मेटेंनी जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली. शिवाय राज्यात युतीसोबत राहू, पण बीडमध्ये भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना मदत करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
शिवसंग्रामचा पाठिंबा नसल्याचा भाजपवर काहीही परिणाम जाणवला नाही आणि 2014 पेक्षा जास्त मतांनी डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या.
लोकसभा निवडणुकीवेळी शिवसंग्रामचे अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्रामचे एकमेव भारत काळे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या शून्यावर आली.
महत्वाच्या बातम्या-
भाजप-सेनेत मेळ नाही… कदम म्हणतात ‘आमचं ठरलंय’! तर महाजन म्हणतात… – https://t.co/jHyKiTETFa @iramdaskadam @girishdmahajan @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
चिदंबरम यांना मोठा झटका…! आता तिहारमध्ये 14 दिवस मुक्काम https://t.co/E7e9S11Ymr @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे म्हणतात… https://t.co/8pJcyaVrGg @supriya_sule @ChhaganCBhujbal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019