मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्यनेनंतर सगळ्यांनाच जोरदार धक्का बसला. त्याच्या गळफासाला उणीपुरे 8 तास देखील होत नाहीत तोपर्यंतच इकडे मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या एका मुलाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे.
शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने घरातल्या सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक श्रीकांत शेट्ये असं या नगरसेवकाच्या मुलाचं नाव आहे. अभिषेकने अवघ्या 25 व्या वर्षी हे हे जग सोडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतल्या चेंबूरमधल्या सुमन नगर प्रभाग क्रमांक 155 चे शेट्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत. याच परिसरात त्यांचं घर आहे. तसंच तिथेच ते वास्तव्याला होते. राहत्या घरीच अभिषेकने गळफास घेतला आहे.
रविवारी तो अन् त्याचा भाऊ घरात होते. ते दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपले होते.अभिषेत बराच वेळ उठला नाही असा विचार करून त्याचा भाऊ त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला मात्र तोपर्यंत अभिषेकने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला होता. यासंबंधीचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, अमित शहा आम्ही तुम्हाला विनंती करतो की…- सुशांतचे नातेवाईक
-सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-
-‘दोष माझाच आहे मी त्याच्या…’; सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरची भावूक पोस्ट
-‘सुशांत नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होता’; कुटुंबातील व्यक्तीचा खुलासा