महाराष्ट्र मुंबई

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही? याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे.

शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. , असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काही जणांचं म्हणणं होतं ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट पद्धतीने नको असं मी स्पष्ट सांगितलं. वर्गाशिवाय शाळा सुरु कऱण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी मी अनेक तज्ञांशी बोलत आहे. ऑनलाइन शिक्षण मोठं आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न सुरु आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-कोल्हापुरात खजाना गवसला; शेतकऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं सापडलं

-शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथं पत्र; केली ‘ही’ मागणी

-एक जूननंतर लॉकडाउन हटवणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

-तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी

-पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?