पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. एका कार्यक्रमादरम्यान यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता करू नका. उडाले ते कावळे!, अशी टीका पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली होती. शिवसेनेने त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून खरपूस टीका केली आहे.

जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारं कोण होतं? पवारसाहेब तुम्हीच होता, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटल आहे. 

राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत. तसेच कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावं लागतं. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावंच लागतं, असं म्हणत शिवसेनेने पवारांवर निशाणा साधला आहे.

जे सोडून गेले ते कावळे आणि आता उरलेल्या मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त होता. शरद पवार यांनीच त्या कावळ्यांना इतर पक्षाच्या पिंजऱ्यातून पळवून आणलं होतं. परंतु पंधरा वर्ष सत्तेत राहूनही त्या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाही. अखेर कावळे हे कावळेच राहिले, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

तसेच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला असून विकास आणि जनतेचे कल्याण याच अजेंड्यावर सत्ता आणि जागांचे समान वाटप होणार असल्याचंही समानामधून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका

-सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

-रवी शास्त्रींच्या निवडीवर कपिल देव म्हणतात…

-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे

-कलम 370 मुद्द्यावर अकबरूद्दीन यांनी पाकिस्तानी पत्रकारांची केली बोलती बंद!