“भास्कर जाधव, तुम्हाला जिंकण्याची खात्री नव्हती म्हणून आमच्याकडे आलात”

मुंबई | शिवसेनेत प्रवेश करताना माझी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी आश्वासनही दिलं होतं, मात्र दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. मला कशाचाही मोह नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही याचं वाईट वाटतं, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मनातील खदखद व्यक्त केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडवट टीका करत निशाणा साधला आहे.

आम्ही शब्द दिला असता तर तो पाळला असता. तुम्ही तुमचा पक्ष सोडलात, कारण तुम्हाला तिकडे जिंकून येण्याची यात्री नव्हती. युतीचे वारे होते म्हणून तुम्ही शिवसेनेत आलात, असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अनेक लोक बाहेरच्या पक्षातून शिवसेनेत आले. त्यांना उमेदवारी देऊन आम्ही जिंकून आणलं. त्यामुळे तुमचा मान-सन्मान राखला गेला आहे. ज्यांना शब्द दिला होता त्या अपक्षांना मंत्री केलं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून अनेक नेत्यांना डावलण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांनी उघडउघड पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-