मुंबई :माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मोठ्या नाट्यानंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. शिवसेनेने आपल्या ‘सामना’या मुखपत्रातून चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे.
चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते. त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शाह, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
चिदंबरम हे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. परंचु ते कायद्याच्या वर नाहीत, असे अग्रलेखातून म्हटलं आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.62 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय? ते चिदंबरम आणि कार्ती यांनाच माहित असल्याचे यात नमूद करण्यात आलं आहे.
चिदंबरम हे गृहमंत्री असताना सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून अमित शाह, नरेंद्र मोदी, प्रज्ञासिंह ठाकूर हे त्यांचे बळी ठरले होते. तसेच चिंदबरम हे ज्येष्ठ वकील आहे. ज्याक्षणी चिदंबरम यांचा जामीन न्यायालयाने रद्द केला.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावर तातडीच्या सुनावणीस नकार दिला, त्या वेळीच चिदंबरम यांनी स्वतःहून सीबीआय मुख्यालयात हजर व्हायला हवे होते, असेही यात नमूद करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या’ ट्वीटवरुन सयाजी शिंदेनी केली दिलगिरी व्यक्त
-महापूराच्या नुकसानीचा अंदाज पाठवा- अमित शहा
-“ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं त्यांच्यावर सूड घेऊन आम्हाला कोणता लाभ?”
-“तुम्ही कितीही चौकशी करा, माझं तोंड मी बंद करणार नाही”
-…मग मी बोलले तर कुठे बिघडलं- अंजली दमानिया