मुंबई | निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना राममंदिरप्रश्नी आक्रमक झाली आहे. नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी यावरच शिवसेनेचे कान टोचत राममंदिराचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. अतातायीपणा करणं टाळावं, असं म्हटलं. त्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने भाजप नेत्यांना चिमटे काढले आहेत.
भाजपमध्येच जास्त वाचाळवीर आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी राममंदिरप्रश्नी अनेक वक्तव्ये केली आहेत. भाजप नेत्यांनी तोंडास कुलपं घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे आहे पण त्यावर बोलणारे वाचाळवीर जास्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड आपण समजून घेतली पाहिजे. बडेबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी यावर बोलणं टाळलं पाहिजे, असा सल्ला शिवसेनेनं भाजपला दिला आहे.
संबित पात्रा, गिरीराज सिंह, प्रज्ञा ठाकूर खरं तर यांना सांगितलं पाहिजे की आपली वाचाळ वक्तव्य थांबवावीत, अशाच भावना शिवसेनेनं आजच्या अग्रलेखातून मांडल्या आहेत.
दरम्यान, मोदी आणि शहा ज्या प्रकारे साहसी निर्णय घेऊन देशवासियांची मने जिंकत आहेत त्याप्रकारे ते राममंदिरचा विषयी निकाली काढतील असा देशवासियांना विश्वास आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री काहीही बोलू शकतात कारण त्यांच्यावर नागपुरचे संस्कार आहेत; पवारांची बोचरी टीका https://t.co/xWv0R6rGfH @PawarSpeaks @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
मला काही नको… अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करायचंय हीच माझी इच्छा- शरद पवार https://t.co/0olQHZBCbz @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
“पाकिस्तानमधून कांदा आयात होतोय… शरद पवारांना ही चुकीची माहिती मिळालीय”https://t.co/XRwmeZ3uXN @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019