मुंबई | सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामना मुखपत्रातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, अशी टीका सेनेनं केली आहे.
महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी झाली आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार? असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात 58 पैकी 40 जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
ग्रामीण भागातील जनता भाजपच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
'साहित्य संमेलनाला जाऊ नका'; ना. धो. महानोरांना ब्राम्हण महासंघाची धमकी? – https://t.co/oyiTF509oD @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे येऊन बसले, अन्… – https://t.co/MK5U75iAbD @imtiaz_jaleel
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
पुण्यातील मनसे कार्यालय 'भगवा'मय! – https://t.co/qnv9b4S9Ex @RajThackeray @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020