‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून या प्रकरणाला रोज नवं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच समोर येत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली. तर यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार नाही म्हणजे नाही या मागणीवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.

शिंदेंच्या गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस मोठं होत आहे. तर 21 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच परत येतील, असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे.

राजकीय वातावरण तापलं असताना शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. गुवाहाटीत बसून पत्रव्यावहार करू नका असं आवाहनही राऊतांनी केलं

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. फक्त तुम्ही मुंबईत यायची हिंमत करा. 24 तासांत मुंबईत परत या उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं आवाहन संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.

संजय राऊतांच्या या आवाहनानंतर आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं ही एकनाथ शिंदेंची पहिली अट होती.

दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे. त्यामुळे महावाकास आघाडी सरकरा टिकणार की पडणार, महाराष्ट्रात सत्तापालट होणार का, हे बघावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन; वर्षावर आता ‘इतकेच’ आमदार उरले

“काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं पण…”; बंडखोर आमदाराचं खुलं पत्र

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या पत्राने खळबळ; बडवे उल्लेख करत केले अत्यंत गंभीर आरोप

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता

शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ