‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाच्या पवित्रा घेतल्यानंतर राज्यासह देशातील राजकारण देखील ढवळून निघालं. त्यानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केला पण काही दिवसानंतर त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे तो रद्द केला.

राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सातत्याने राज ठाकरे व मनसेवर टीका करताना दिसत आहेत. दीपाली यांनी आणखी एकदा मनसेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवसैनिक, शिवसेना नेते व कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत.

दीपाली सय्यद देखील अयोध्येत दाखल झाल्या असून त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित केली. यावेळी बोलताना दीपाली सय्यद यांनी आणखी एकदा मनसेला डिवचलं आहे.

आपणच दौरा घोषित करायचा आणि तो रद्द करायचा, अशी खोचक टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे. हिंदुत्वाचा पताका आपल्याच खांद्यावर असल्याचं भासवणं योग्य नसल्याचा टोला देखील दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

अयोध्येतून बोलताना शिवसेनेचंच हिंदुत्व असली असल्याचं दीपाली सय्यद यांनी ठणकावून सांगितलं. तर दौरा घोषित करून तो रद्द केल्यावरून त्यांनी मनसेला फटकारलं आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी दीपाली सय्यद यांच्यासह खासदार संजय राऊत, जेष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”

‘फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली’, दीपाली सय्यद कडाडल्या

रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले ‘विरोधकांनी माझ्या मागे….’

“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”