मुंबई | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब झालेलं हल्ला प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पायपीट केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याचबरोबर त्यांना 10 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता. त्यानंतर नितेश राणे वकिलांच्या सल्लाने न्यायालयासमोर हजर झाले होते.
नितेश राणे यांना कणकवलीच्या दिवाणी न्यायलयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीत असणार आहे.
नितेश राणे यांच्या अटकेवरून आता शिवसेनेने टोलेबाजी सुरू केल्याचं पहायला मिळतंय. या प्रकरणी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व प्रयत्न करून झाले आणि या पूर्वीच त्यांनी कायद्याचं पालन केलं असतं, कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर त्यांची प्रतिमा थोडी तरी टिकून राहिली असती, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
आज त्यांची सर्व प्रतिमा लयास गेली आहे. कायद्यापुढं कोणाच काही चालत नाही आणि कायदा सर्वांसाठी समान असतो निदान हा बोध राणे यांनी आत्तातरी घ्यायला पाहिजे,असा सल्ला देखील कायंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, राणे कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेवर आता निलेश राणे आणि नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ
BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम
IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता
रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ