जनआशीर्वाद यात्रेमुळं महाराष्ट्र शिवसेनामय; संंजय राऊतांचा विश्वास

जळगाव : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा उद्देश हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि पक्षसंघटनेचा विस्तार करणेे हाच आहे. या जनआशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे हे आश्वासक नेतृत्व असल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत. जळगावमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पीक विमा कंपन्या खासगी आहेत. या कंपन्या सत्तेच्या भागीदार नाहीत. विरोधी पक्ष कुचकामी आणि वैफल्यग्रस्त झाला आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यालाही शिवसेनेने जागे केले आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असून सरकार आणि न्यायालय याबाबत निर्णय घेईल. दोन वर्षात हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-आता शिवसेना शाखाप्रमुखांवर थेट ‘मातोश्री’वरुन वाॅच

-“खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कूलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल”

-सत्य आणि न्यायाचाच विजय झाला; कूलभूषण जाधव प्रकरणी मोदींची प्रतिक्रिया

-माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च करु नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

-चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेने काढलेला मोर्चा योग्यच!