मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची स्तुती करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून कार्यक्षमता आम्ही सांगलीच्या महापुरात पाहिली. भीमा कोरेगाव दंगलीतही त्यांची कार्यक्षमता पाहिली. तेव्हा महाराष्ट्र जळत होता. त्यात मला फार बोलायला लावू नका. सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलं नाही. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि कायम बसावं लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
राज्य सरकार एका अग्निपरिक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडल्यासारखी स्थिती आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस या महिनाभरात लागला. त्यांनी आपल्या कामातून लोकांना दाखवून दिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या”
-मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- मुख्यमंत्री
-राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 49वर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
-बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला