पुणे महाराष्ट्र

“आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी”

पुणे : मुंबईत रविवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत स्वबळावर लढण्याबाबत बोललं गेलं. त्याचं संदर्भात शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अभिमन्युसारखे चक्रव्यूहात अडकवण्यात आलं होतं. मात्र यावेळी शिवसेना गाफील राहणार नाही. ‘एकला चलो रे’ची आमचीही तयारी आहे, असं तानाजी सावंत भाजपला उत्तर देताना म्हणाले आहेत.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, भूम, परांडा रहिवाशी संघाचा मेळावा पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी आयोजित केला होता. त्या मेळाव्यात त्यांनी भाजपला उत्तर दिलं आहे.

भाजपने स्वबळावर लढण्याच्या भाषेसारखी शिवसेनेही अशीच भाषा केली आहे. एवढंच नाही तर उस्मानाबादच्या सर्व सहाच्या सहा जागा शिवसेनाच लढवून जिंकणार असल्याचा दावाही सावंतांनी केला आहे. 

तुम्ही मला विधानसभेला पाठवणार आहात, असं म्हणत विधानपरिषदेचे सदस्य तानाजी सावंत यांनी भूम, परांडा आणि वाशी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. 

 

महत्वाच्या बातम्या-

-रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय??- बच्चू कडू

-शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला अन् शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले- आदित्य ठाकरे

-शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा

-मी अशा ठिकाणी जन्मलोय जिथली भाषा तुम्हाला कळत नाही- रावसाहेब दानवे

-‘मिशन वेस्ट इंडिज’! ‘या’ 15 जणांची भारतीय संघासाठी निवड

 

IMPIMP