विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल!

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला धक्का देत भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणला होता. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीतही राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीला दणका देण्याची शक्यता आहे. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआतर्फे अधिक खबरदारी घेतली जात आहे. शिवसेनेनं दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला.

शिवसैनिक आमदारांना तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सेना समर्थित आमदारांना पवई येथील हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं आहे. कालपासूनच यासंबंधीच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना दोन दिवस आधीपासूनच पवईच्या हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावण्यात आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही मविआतर्फे आमदारांना एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं होतं.

खबरदारी घेऊनही ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआतर्फे अधिक काळजी घेतली जात असल्याचं दिसतंय.

शिवेसेनेचे नेते एक बैठक घेऊन सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये शिवेसनेच्या आमदारांचा मुक्काम होता.

दरम्यान, भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अलीकडे भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता भाजपच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी! 

सर्वात मोठी बातमी; वाढत्या विरोधानंतर अग्निपथ योजनेत सरकारने केला मोठा बदल 

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; ‘त्या’ चिठ्ठीने पुण्यात खळबळ 

“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले…