महाराष्ट्र मुंबई

सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई |  राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने वरळी मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे नाराज असल्याचं कळतंय. शिवेसेनाला ‘जय महाराष्ट्र’ करून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा सुनिल शिंदेंनी पराभव केला होता. परंतू आता अहिरच शिवसेनेत दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर गडांतर आल्याचं बोललं जातंय. म्हणून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं वृत्त TV9 मराठी या वृत्तवाहिनेने दिलं आहे.

सुनिल शिंदे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत, अशी देखील माहिती मिळत आहेत. अहिर शिवसेनेत दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडे वरळी विधानसभा मतदारसंघात आश्वासक चेहरा नाहीये.

दरम्यान, सुनिल शिंदेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या जरी चर्चा रंगत असल्या तरी त्यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलंय. हे वृत्त निराधार असून या बातमीत अजिबात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

-30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

-मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

-मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

-शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

IMPIMP