“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारपणामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जात नव्हते. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्री आले नाहीत.

मुख्यमंत्री महत्त्वाच्या कार्यक्रमात येत नसल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) कार्यक्रमाला हजेरी लावली.

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी वर्षा या शासकीय निवासस्थानी झेंडा फडकवला. उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती.

त्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर टीका करणारा राज्यातील विरोधी पक्ष हा नामर्द असल्याची जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आजारपणाच्या काळात झालेली टीका ही माणुसकी आणि नीतीमत्तेला धरुन नव्हती, असं राऊत म्हणाले आहेत. विरोधक नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत राहिले. मात्र, राज्यातील जनतेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे हे दिसून आलं असंही राऊत म्हणाले आहेत. गेल्या दोन वर्षापासून भाजपचे नेते नामर्दांगी शब्द वापरत आहेत, त्यामुळे मी देखील तोच शब्द वापरला, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीतून काम करत होते. मात्र आता फिल्डवर येऊन काम करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये” 

युवराज सिंग झाला बाबा, घरी छोट्या ‘युवराज’चं आगमन 

‘शरद पवार आहेत म्हणून…’; ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मोबाईल नंबर Block केल्याचा आला राग, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं