विधानसभेत एवढ्या आमदारांनी दिला ठाकरे सरकारला पाठिंबा

मुंबई : ठाकरे सरकारची बहुमत चाचणी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सुरु आहे. यावेळी हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सरकारच्या बाजूने असलेल्या आमदारांना आपल्या जागेवर उभं राहुन आकडे म्हणण्यास सांगितलं. यावेळी ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं.

महाविकास आघाडी सरकारनं विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला होता. त्यामुळे सभागृहात एकही विरोधी मत पडलं नाही. तर एकूण 4 आमदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून 165 ते 170 आमदारांचा महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. त्यामुळे नेत्यांच्या अनुमानानुसार आघाडीच्या बाजुने मतं पडली आहे.

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा होती. त्यामुळे ही अग्निपरिक्षा उद्धव ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-