“चांदमियां पाटील, राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते”

मुंबई | प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणं बंद करा. श्रीरामाला त्रास होईल, असा टोला शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा- सयाजी शिंदे

-अजित पवारांनी घेतला कोरोनाचा धसका, म्हणाले लांबूनच करा नमस्कार

-ज्येष्ठांसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी केली मोठी घोषणा

-“पाटीलसाहेब, छात्या बडवणं बंद करा आता श्रीरामालापण त्रास होईल”

-झेंडा बदलल्यानंतर आज मनसेचा पहिला वर्धापनदिन