मुंबई : देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका, या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेकडे सरकारकची वाटचाल सुरु आहे. या देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा. ‘एक देश, एक संविधान’ या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.
समान नागरी कायदा हे शिवसेनेच्या वचननाम्यातील वचन आहे. त्यामुळे एका देशात सर्व गोष्टी एकच असायला हव्या. भाषावार प्रांतरचनेनुसार त्या त्या राज्यात आपण त्या त्या भाषेचे महत्व ठेऊन आपण कायम पुढे जाऊ शकतो. हे गेल्या कित्येक वर्षात दाखवून दिलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राज्यात स्वतंत्र कायदा असूच शकत नाही. ज्या राज्यात असा कायदा होता त्या जम्मू काश्मीरमधील कलम 370 आता रद्द झालेला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मातोश्री’वर पत्रकारांशी ते बोलत होते.
लोकसंख्येचे नियंत्रण व्हायला पाहिजे. हा शिवसेनाप्रमुखांचा अजेंडा आहे. ‘हम दो, हमारे पच्चीस’ याला सर्वात पहिल्यांदा शिवसेनाप्रमुखांनी तोंड फोडले, असं शिवसेनेची भूमिका मांडताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
तिहेरी तलाकविरोधातील कायदा हा जनसंख्या नियंत्रणाच्या दिशेने महत्वाचं पाऊल आहे. शिवसेनेने मांडलेल्या भूमिका केंद्रात मोदी सरकारने स्विकारल्या आहेत. तिहेरी तलाकविरोधात कायदा आणि कलम 370 रद्द करुन सरकार समान नागरी कायद्याच्या दिशेने महत्वाची पाऊलं टाकत आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!
-“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे झकलण्याची गरज नाही”
-“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”