महाराष्ट्र मुंबई

शिवसेना सत्तेत पण शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून उद्धव ठाकरे स्वत: मैदानात!

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून विमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढला आहे. या मोर्च्यात शिवसेनेचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

शिवसेना काढणार असलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नाही तर शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यानुसार आज शिवसेनेने आक्रमक होत पीकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समधील ‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सामिल झाले आहे.

विमा कंपन्यांनी योग्य पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करावी, वेळच्यावेळेला शेतकऱ्यांना विमा द्यावा, त्यांना नाडू नये, यासाठीचा शिवसेनेचा आजचा मोर्चा आहे, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

शेतकरी प्रश्नांवर शिवसेना मागील काही दिवसांपासून आक्रमक आहे. उद्धव ठाकरेंनी दुष्काळ दौरा केला होता तेव्हा त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना धडा शिकवू, असं ते म्हणाले होते. 

दरम्यान, एकीकडे सत्तेत पण रहायचं आणि दुसरीकडे मोर्चा काढायचा ही कुठली पद्धत?? शिवसेना एवढ्या दिवस काय झोपली होती का?, अशी खरमरीत टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

IMPIMP