शिवसेना दिलेला शब्द पाळणार; 10 रूपयात मिळणार जेवणाची थाळी!

मुंबई : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्या आधी काही तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम घोषीत केला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, नोकऱ्यांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना संधी मिळावी म्हणून कायदा आणि 10 रुपयांत थाळी ही या किमान समान कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत .तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्याने त्यांनी तीनही पक्षांच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे एकत्र करत हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे.

सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार असल्यातं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं आहे.  शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार, असल्याचंही नेत्यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा शेतकरी, कामगार हा मुख्य अजेंडा राहणार असून सर्वांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल असंही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-