“आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही, त्यांचा बालही बाका होणार नाही”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी पाहायला मिळाल्या. पंजाबमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर राजकारण चांगलंच रंगलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत घडलेल्या प्रकारानंतर सर्वच पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकारावर आता शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान मोदींना अनेक टोले लगावण्यात आले आहेत. सामनातून पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून शिवसेनेने काळजी व्यक्त केली आहे पण अनेक दाखले देत टीका देखील केली आहे.

देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगाना सामोरं जावं लागलंच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबमध्ये जे घडलं ते चिंताजनक, तितकंच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सामनातून देण्यात आली आहे.

आम्ही मोदी यांना निरोगी दिर्घायुष्य चिंततो. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबमधील सर्वप्रकाराची सखोल चौकशी व्हायलाच हवी,अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.

आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जगातील दहा सर्वोच्च नेत्यांच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था पंतप्रधान मोदी यांना लाभली आहे. आपल्या पंतप्रधानांचा बालही बाका होणार नाही, असंही लेखात म्हटलं आहे.

आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी व्हायला हवी, म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे.

नवीन वर्षात पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून देवदिवाळी सुरू केली आहे, पण मुळात घडले काय, घडले कसे व जे घडले त्यास जबाबदार कोण याचा थांगपत्ता लागणे आवश्यक आहे, असा मुद्दाही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत साप समजून भुई धोपटणे हा प्रकार योग्य नाही व त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील फटी व चिरा कधीच बुजवता येणार नाहीत, अशी टीका देखील आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राखी सावंतला भेडसावतेय ‘ही’ भीती, बिग बॉसच्या घरात केला खुलासा

राजधानी दिल्लीत 55 तासांचा कर्फ्यू; पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर

कोरोनाचा हाहाकार! केंद्राने जारी केल्या ‘या’ नव्या गाईडलाईन्स

कझाकीस्तानात तणावाचं वातावरण, सरकारने दिला ‘तो’ हिटलरी हुकूम अन्…

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर