“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”

मुंबई | सैनिक, पोलीस चोवीस तास डोळ्यांत तेल घालून काम करतात. ते त्यांचे कर्तव्यच ठरतं. पण सुट्ट्यांच्या बाबतीतही आपल्या देशात समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये?, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केला आहे.

कारखान्यात, रस्त्यांवर, शेतात मोलमजुरी करणाऱ्या जनतेसाठी देखील सरकारने काहीतरी करावं. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांनीदेखील या गोष्टीची जाणीव ठेवत काम करावं, असा सल्लादेखील सामनातून देण्यात आला आहे.

देशाचे राज्यकर्ते इतर देशांतील राज्यकर्त्यांप्रमाणे ट्रेन, मेट्रो, ट्राम, बसने प्रवास करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी सुट्टी वगैरे न घेता काम करावे यात कौतुक ते काय, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान 18-19 तास काम करतात असे नेहमीच सांगितले जातं. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल यांनी अहोरात्र जनतेची सेवा करावी हीच अपेक्षा असते, अंसही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तो मी नव्हेच!; अशोक चव्हाणांचं ‘त्या’ पत्रावर स्ष्टीकरण

-मला शरद पवारांवर पीएचडी करायचीय- चंद्रकांत पाटील

-बास की आता उद्धवजी, सत्तेसाठी अजून किती लाचार व्हाल?- देवेंद्र फडणवीस

-इंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का!

-… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार