Top news महाराष्ट्र मुंबई

‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

मुंबई |  महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 5 जागा लढवणार, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्र्यांचा बिनविरोध आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून यावर दीर्घ भाष्य करत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत व मुख्यमंत्र्यांनी निवडून जावे यासाठीच या निवडणुकीचे प्रयोजन आहे. राज्य कोरोना काळात अस्थिर होऊ नये हाच या निवडणुकीमागचा हेतू आहे. त्यामुळे ‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित हेच महत्त्वाचे होते , असं संजय राऊत यांनी आज्चया अग्रलेखात म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाने एकच उमेदवार रिंगणात ठेवल्याने निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरूनच हे घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामोपचाराच्या राजकारणावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वीस हजारांवर पोहोचली आहे. चारशेच्या आसपास लोकांचे मृत्यू झाले आहेत. लोक संकटात आहेत. धोका वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपर्‍यातून आमदारांनी एका निवडणुकीसाठी मुंबईला येणे बरे दिसले नसते. यात जीवाचा धोका तर होताच, मात्र लोकांना काय तोंड द्यायचे हा प्रश्नसुद्धा होताच. लोकांनी कामधंदे सोडून कडीकुलूपात घरी बसायचे आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचे, असे घडणे योग्य नव्हते, असंही पुढे राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”

-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा

-प्रेरणादायी! 85 वर्षांच्या आजी मजूरांना देतायत 1 रुपयात इडली चटणी

-…म्हणून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींना मिळाली विधान परिषदेची उमेदवारी!

-उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत