“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”

मुंबई |  सोमवारी काश्मिरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखातून दीर्भ भाष्य केलं आहे. काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा, असं, म्हणत काल पाच वीरांनी देशासाठी बलिदान दिलं त्यामध्ये एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू -मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये, असं टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी भावनिक आवाहन केले आहे. या कोरोना योद्ध्यांवर फुले बरसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सैन्याच्या तिन्ही दलांना मैदानात आणि आकाशात उतरवले. कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी आकाशातून या कोरोना योद्ध्यांवर पुष्पवृष्टी केली. काही ठिकाणी लष्कराच्या बॅण्ड पथकानेही मानवंदना दिली. पायदळ व नौदलानेही या मानवंदना सोहोळ्यात भाग घेतला. हासुद्धा एक वेगळाच सोहळा घडवून आणला, पण त्याचवेळी कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांबरोबर चकमक सुरू होती. कर्नल आशुतोष शर्मा व त्यांचे चार सहकारी देश रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते. या लढाईत हे पाचही वीर हुतात्मा झाले, असं राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा झालेल्या या शूर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कर्तव्य बजावले आहे. पाचही वीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे व त्यातील एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू -मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मोदी सरकार अपयशी; मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही”

-उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री

-विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…

-मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन

-परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार- मंत्री उदय सामंत