Top news महाराष्ट्र मुंबई

…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा

मुंबई |  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे समर्थकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अनेकांच्या मागणीनंतर दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर राज ठाकरे समर्थकांनी संजय राऊत यांना माफी मागावी, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीची राऊत यांनी आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.

मुंबईच्या दुकानांसमोर लोकांनी तोबा गर्दी केल्यामुळे मुंबईतील वाईन शॉप पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. ज्या कोणाला वाटत असेल की हा सरकारचा निर्णय योग्य नाही व लोकांना दारूपासून वंचित ठेवून मोठाच अन्याय केला आहे, त्यांनी सरकारी परवानगीने घरपोच दारू बाटल्या पोहोचविण्याची सेवा सुरू करायला हरकत नाही. शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे समर्थकांना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी दारू दुकाने उघडा असे सांगितले तेव्हा डॉ. अभय बंग यांच्यासह अनेक प्रमुख लोकांनी त्या भूमिकेस विरोध केला. विरोध करणारे मूर्ख आहेत व त्यांना अर्थव्यवस्थेचे काहीच कळत नाही, असे राजसमर्थक पत्रक काढून सांगू लागले, पण सरकारने दारू दुकाने उघडून राज ठाकरे यांची भूमिका मान्य केली, त्यामुळे दारूविक्रीस विरोध करणार्‍यांनी राज ठाकरे यांची माफी मागावी, अशी पोरकट मागणी करण्यापर्यंत काहीजण पोहोचले. अशा पोरकटांनी आता काय करावे? दारू दुकाने उघडल्यावर ज्याचे भय सरकारला होते तेच घडले, असं राऊत म्हणाले आहेत.

लोकांना जगायचे आहे, पण दारू ही जगण्याची संजीवनी नाही. लोकांना कोरोनावर ‘लस’ हवी आहे. दारू म्हणजे अशा प्रकारची ‘लस’ नाही. दारू दुकाने म्हणजे लस संशोधन केंद्र नाही. सरकारने घेतलेला निर्णय तूर्त बरोबर आहे. 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार ‘कोरोना संक्रमण’ विकत घेणे परवडणारे नाही. संकटाचे भान ठेवा!, असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच- नारायण राणे

-नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार

-‘…तर आर्मी बोलवावी लागेल’; किशोरी पेडणेकरांचा इशारा

-हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

-“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”