तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा; संजय राऊत संतापले

मुंबई |  जागतिक आरोग्य संघटना तसंचआरोग्यावर भाष्य करणाऱ्या विविध संख्या संघटना ह्या कोरोनाच्या काळात विविध आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. तसंच अहवाल सादर करून अनेक इशारे देखील देत आहेत. या आकड्यांमुळे सामान्य माणसावर परिणाम होऊन तो घाबरून जातो आहे. तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे आता थांबवा, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

आजच्या सामनामधून जागतिक आरोग्य संघटनेवर तसंच युनिसेफ आणि विविध संघटनांच्या आकडेवारीवर तसंच अहवालावर संजय राऊत यांनी ताशेरे ओढले आहेत. निष्कर्ष जनतेच्या प्रबोधनासाठी जाहीर होतात हे गृहीत धरले तरी सध्याचे कोरोना हे ‘न भूतो’ असे संकट आहे. त्याला सामान्य माणूस प्रथमच तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करणारे आणि कोरोना संसर्गापेक्षा भीतीचा प्रादुर्भावच समाजात फैलावणारे ‘तज्ञ’ अहवाल आता आवरा, असं ते म्हणाले.

कोरोनावर जागतिक आरोग्य संघटनेपासून इतर छोट्या-मोठ्या संस्थांचे अहवाल आणि त्यांचे निष्कर्ष यांची भर पडत आहे. हे संशोधन, अभ्यास जनतेच्या भल्यासाठी केला जात आहे हे मान्य, पण त्यामुळे जर आधीच कोरोनाभयाने ठास्त असलेली जनता अधिक घाबरणार असेल तर कसे चालेल? जे अहवाल सद्यस्थितीत उपयुक्त आहेत ते ठीक, पण जे तसे नाहीत ते तूर्त गुंडाळून ठेवायला काय हरकत आहे, अशी विचारणा राऊत यांनी केली आहे.

मध्यंतरी केंद्र सरकारच्याच एका यंत्रणेने 15 मार्चपर्यंत 6 लाख मुंबईकरांना कोरोना होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आणखीही काही आकडेमोड केली होती. आज 15 मेनंतर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा किती आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तो कमी व्हायला हवा हे मान्य केले तरी 6 लाखांच्या ‘निष्कर्षा’ने त्यावेळी फक्त सनसनाटी आणि भीतीची लहरच पसरवली असेच आता म्हणावे लागेल, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना संजय राऊत यांचा सल्ला, म्हणाले…

-ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

-केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा; चंद्रकांतदादा भडकले

-निर्मलाआक्का, इथं संवेदना अन् माणुसकी व्यक्त होते; आव्हाडांकडून सीतारामन यांचा समाचार

-बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’