“नाच्यांना सुरक्षा देऊन भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचं पितळ उघडं”

मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन बंड पुकारलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून शिंदे हे गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे.

खरं तर हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा ‘बिग बुल’ आहेत. लोकशाहीला लागलेला हा कलंकच आहे. तो कलंक सुरक्षित ठेवण्यासाठी काय हा आटापिटा?, असा सवाल सेनेनं केला आहे.

भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचं पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडलं आहे, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

अखेर गुवाहाटी प्रकरणात भाजपचे धोतर सुटले आहे. शिवसेना आमदारांचे बंड हा त्यांचा अंतर्गत मामला आहे असे हे लोक दिवसाढवळ्या सांगत होते. पण बडोद्यात म्हणे श्रीमंत देवेंद्र फडणवीस आणि अतिश्रीमंत एकदास शिंदे यांची काळोखात गुप्त भेट झाली, असं ते म्हणालेत.

केंद्र सरकारने त्यातील 15 जणांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये सरळ सरळ हस्तक्षेप आहे. अर्थात केंद्रातील विद्यमान राज्यकर्त्यांच्या एकाधिकारशाहीचा हा काही पहिलाच नमुना नाही, असंही ते म्हणालेत.

फक्त मी नाही त्यातली. या त्यांच्या आवडत्या पद्धतीने हे लोक आपला काही संबंध नाही असं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही सेनेनं केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

संजय राऊतांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊतही शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत! 

“महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार” 

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ 

आणखी एक मंत्री नॉट रिचेबल; शिवसेनेचं टेंशन वाढलं

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा