मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार काल (दि. 9) झाला. यावेळी शिंदेसेनेच्या नऊ आणि भाजपच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यावरुन आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामाना दैनिकातून नवीन सरकारचा समाचार घेण्यात आला आहे. पाळणा हलला आता दोऱ्या कोणाकडे? असा प्रश्न विचारत शिवसेनेने शिंदे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे.
किचकाने दौपदीचा विनयभंग केला. मांडीवर थाप मारुन तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून मग भीमाने किचकाची मांडी फोडली. आता श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या दोनही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत.
तसेच हेच पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे काम मंत्रिमंडळ विस्तारातून सुरु आहेत. ही महाराष्ट्राची बदनामी आहे. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेला आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे रहावा, असे सामनातून म्हंटले आहे.
9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन (August Kranti Din) शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी निवडण्यात आला. पण जर का हे लोक विश्वासघात आणि बईमानीला क्रांती म्हणणार असतील, तर शिंदेंच्या मंत्र्यांनी आपल्या दालनात लखोबा लोखंडेचा (Lakhoba Lokhande) फोटो लावावा, असे शिवसेनेने सांगितले.
महाराष्ट्राची जनता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांना माफ करणार नाही. ही त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनात लखलाभ लाभो, असे शिवसेने आपल्या मुखपत्रात म्हंटले आहे.
अखेर चाळीस दिवसांनी शिंदे-फडणवीस सरकार बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नेमके काय आहे? ते समजायला मार्ग नाही. मंत्र्यांना शपथा देताना राज्यपाल (Bhagatsingh Koshyari) महोदयांचा चेहरा कसा आनंदाने न्हाऊन निघाला होता. फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून घडत असल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, असे म्हणत राज्यपालांचा देखील समाचार सामनाच्या संपादकीयात घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
शरद पवारांचे भाजपवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
‘… त्याचेच परिणाम शिवसेनेला भोगावे लागतायत’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?
शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…
संघपरिवारातील संघटनेकडून शिंदे सरकारला विरोध?; महत्त्वाची माहिती समोर