“पवारांच्या अनुभवाचा मोरंबा दिल्लीश्वरांना चाखता आला नाही”

मुंबई | शेठ, हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडाल, असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऑफर दिल्यावरुन शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही, असा टोलाही शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? याचं उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिलं. जर पवारांनी काय केलं ही शंका अमित शाह वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा नरेंद्र मोदी यांना
अपेक्षित होता?, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

दरम्यान, शेठ, काय हे, हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, असा इशारा नरेंद्र मोदींना ‘सामना’तून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-