मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आम्ही आमच्या कामाने आणि जनतेमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाच्या जोरावर आम्ही माणसं जिंकली आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मला फोडलेली माणसं नकोत. मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत. शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक हे तुमच्यासोबत आहेत, असंही उद्धव ठाकरे अहिरांना शुभेच्छा देताना म्हणाले.
पक्षात नवनवीन घेत असताना आपण त्यांना पक्षात का घेतो, त्यांना कोणती जबाबदारी देतो या सगळ्याचा विचार करुनच आपण त्या व्यक्तीला पक्षात घेतो, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेची ताकद वाढत आहे. ही शिवसेनेचीच नाही तर संपूर्ण मराठी माणसाची ताकद वाढत आहे. हिंदूंची ताकद वाढत आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या-
-“विधानसभेला तरूणांची मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो”
-शिवसेनेत प्रवेश करणार का?, छगन भुजबळ म्हणतात…
स्वार्थ आहे म्हणूनच ‘त्यांचे नेते’ भाजपमध्ये येतात; चंद्रकांत पाटलांची जाहीर कबुली
“साहेबांनी ज्यांना पुत्रवत प्रेम दिलं ते कधीच गद्दारी करणार नाहीत”
-राष्ट्रवादीला गळती; ‘हा’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???