प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं म्हणजे नवरीशिवाय लग्न करणं- शोएब अख्तर

नवी दिल्ली |  सध्या कोरोनामुळे जगभरातील खेळाची मैदाने बंद आहेत. लॉकडाऊन जसजसा शिथील होत आहे तसंतसं खेळाची मैदाने हळूहळू आता सुरू होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. परंतू काही दिवस तरी प्रेक्षकांशिवाय मॅच खेळणं हाच पर्याय असणार आहे. यावर पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तरने आपलं मत व्यक्त केलं आहे.

प्रेक्षकांविना मॅच खेळणं म्हणजे वधुशिवाय विवाह करणं, अशा शब्दात शोएबने प्रेक्षकांचं महत्त्व अधोरेकित केलं आहे. क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक हवेच असतात कारण ते आपल्या टीमला सपोर्ट करत असतात. आणि त्यांच्या सपोर्टने खेळाडूंच्या मनात एक उर्जा संचारत असते, असं शोएबने म्हटलं आहे.

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हे क्रिकेट मंडळासाठी व्यवहार्य आणि टिकाऊ असेल, परंतु त्यानं महसूल जमा केला जाऊ शकतो, असं वाटत नाही नसल्याचं शोएब म्हणाला आहे.

या वर्षभरात कोरोनाची परिस्थिती सुधरेल, तसंच पहिल्यासारखं खेळाची मैदाने प्रेक्षकांनी खचाखच भरतील आणि आपल्यावरंच हे कोरोनाचं संकट दूर होईल, अशी आशा शोएबने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रोज पत्रकार परिषदा घेताय पण लोकांच्या मुखापर्यंत पॅकेज पोहचेल तो दिवस खरा- संजय राऊत

-मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…

-‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!

-मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

-दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च