“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य

मुंबई | भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाणारा विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडूलकर नेहमीच चर्चेत असतो. सचिन तेंडूलकर अभावी क्रिकेटच्या कोणत्याही गप्पा या पुर्ण होत नाहीत.

सचिन तेंडूलकरनं आपल्या क्रिकेट काराकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सचिन तेंडूलकरच्या नावावर न मोडता येणारा अनेक विक्रम आहेत.

सचिन सर्वकालिन महान खेळाडू म्हणून गणला जातो. परिणामी सचिनच्या फलंदाजी तंत्राबाबत अनेकदा विविध माध्यमातून चर्चा होताना दिसत असतात.

सचिन तेंडूलकरचा कट्टर प्रतिस्पर्धी गोलंदाज म्हणून रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरला ओळखलं जातं. शोएब आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत असतो.

शोएब आपल्या बेधडक व्यक्तव्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आता शोएब अख्तरनं चक्क आयसीसीच्या नियमांवर जोरदार टीका केली आहे. सचिन तेंडूलकरच्या फलंदाजीचा आधार घेत ही टीका केली आहे.

वनडे क्रिकेटमध्ये आयसीसीनं अधिक कठोर नियम बनवले आहेत. गोलंदाजांना कमी आणि फलंदाजांना जास्त फायदा मिळत आहे. सध्या फलंदाजांना तीन रिव्ह्यू देखील मिळत आहेत.

सचिनच्या काळात हे नियम असते तर त्यानं एका लाखापेक्षा अधिक धावा केल्या असत्या. सचिन तेंडूलकरनं जगातील सर्व धोकादायक गोलंदाजांचा सामना केला आहे.

खरंतर मला सचिनवर दया येत आहे. त्याने सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनूस विरुद्ध क्रिकेट खेळले. तो शेन वॉर्न विरुद्ध खेळला, असं अख्तर म्हणाला आहे.

सचिन वकार युनूस, वसीम अक्रम, ब्रेट लीसह माझ्याविरोधात खेळला आहे. मला सचिनची दया येते कारण तो आमच्या समवेत नव्या पिडीच्या वेगवान माऱ्याला देखील सामोरं गेला आहे.

सचिन क्रिकेट जगातातील एक महान खेळाडू आहे. तो एक चांगला फलंदाज आहे. परिणामी सचिन तेंडूलकरला आजच्या नियमांचा फायदा त्याकाळी मिळायला पाहीजे होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

 भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर

सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं

12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार

“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार