शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…

मुंबई : अ‌ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू लागून स्टीव्ह स्मिथ जखमी झाला. त्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ट्वीट केलं आहे. पण सोशल मीडियावर सिक्सर किंग युवराज सिंहने शोएब अख्तरच्या ट्वीटला अनोख्या अंदाजात उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर युवराज सिंहचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे. 

जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू स्टीव्ह स्मिथच्या मानेला लागल्याने फिलिप ह्युजेसच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. या बाउन्सरने स्मिथ जागेवरच कोसळला होता. स्मिथने मान झाकली जाणारं हेल्मेट घातलं नव्हतं. 

स्मिथने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला दुखापत झाली असतानाच आर्चरने त्याच्या जवळ जाण्याचंही सौजन्य न दाखवल्याने ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शोएब अख्तरने ट्विटरवरुन चीड व्यक्त केली.

बाऊन्सर्स तर खेळाचा भाग आहेत. पण जेव्हा एखाद्या गोलंदाजामुळे फलंदाजाच्या डोक्याला दुखापत होते, आणि तो पडतो. तेव्हा जाऊन त्याला काही लागलं आहे का? हे पाहणं गोलंदाजाचं कर्तव्य आहे. स्मिथ वेदनेने विव्हळत असताना निघून जाणं आर्चरला शोभत नाही. असं काही घडल्यास फलंदाजाकडे धाव घेणारा मी पहिला असायचो, असं ट्वीट अख्तरने केलं आहे.

हो, तू करायचास. पण तुझ्या मनात असायचं, तू बरा असशील अशी आशा आहे मित्रा, कारण आणखी काही येत आहे, असं शोएब अख्तरच्या ट्वीटला युवराजने भन्नाट उत्तर दिलं आहे..

अख्तर आणि युवराज या दोघांमध्ये ट्वीट जुगलबंदी रंगल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सिक्सर किंगने 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. जेव्हा अख्तर गोलंदाजी करायचा, तेव्हा मी प्रचंड घाबरायचो, अशी कबूली युवराजने निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटरवरुन दिली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

-“महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ झालंय”

-मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!

-“…त्यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा”