नवी दिल्ली | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने त्यांच्या संस्कृती आणि खाण्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
लिजेंड क्रिकेट लीगमध्ये सहभागी झालेला शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्याशी संवाद साधत होता. यावेळी शोएब अख्तर बोलत होता.
भारतीय संघ चांगले वेगवान गोलंदाज तयार करत आहे पण त्यांच्यात उर्जेचा अभाव आहे. भारतीय संघ उत्तम वेगवान गोलंदाज निर्माण करत आहे. पण भारतीय गोलंदाज पाकिस्तान गोलंदाजासारखे नाहीत. पाकिस्तानचे गोलंदाज अधिक धोकादायक आणि दमदार असतात त्याच कारण मांस, असं त्याने म्हटलंय.
आमच्याकडे असलेले आदर्श, अन्न, पर्यावरण, दृष्टीकोन तसेच माझ्यासारखे लोक जे उर्जेने परिपूर्ण आहेत. वेगवान गोलंदाजी करण्यात आम्हाला आनंद मिळतो. तुम्ही जे खाता तेच बनता. आम्ही जनावरे खात असल्याने जनावरांसारखे बनतो, असं शोएबने म्हटलं आहे.
वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर आम्ही सिंहासारखे धावतो. असं खळबळजनक वक्तव्य शोएब अख्तरने यावेळी केलं आहे. त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar )हा आपल्या कारकीर्दीत नेहमी वादग्रस्त राहिला होता.
निवृत्तीच्या जवळपास अकरा वर्षानंतरही शोएब अअख्तर आपल्या अशाच अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक
राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…
Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री आज अर्थसंकल्प सादर करणार; अर्थव्यवस्थेला गती मिळणार?
“राहुल गांधींचं पाकिट कुणी मारलं?”; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती