मोठी बातमी! भाजप नेते किरीट सोमय्यांना झटका

मुंबई | भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.

कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर करण्यात आला आहे.

माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातंय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर नव्याने आरोप करत ‘आएनएस विक्रांत फाइल्स’ उघड केली. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं.

आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबत ही माहिती मागवली होती. मात्र राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

 महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!

राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स