नवी दिल्ली | देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिलांवर बलात्कार झाल्याच्या, त्यांना बेदम मारहाण केल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. आता अशीच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर येथे एका 62 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना समोर आली आहे. तसेच आरोपींनी या महिलेला मारण्यासाठी तिच्या अंगावर बाईक देखील घातली होती. यामुळे तिला गंभीर ईजा झाली आहे. सध्या पिडीत महिलेला ग्वाल्हेरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, आपागंज येथील दिलीप उर्फ कल्लू नावाच्या मिठाई विक्रेत्याला एका कार्यक्रमात जेवण तयार करण्यासाठी ऑर्डर मिळाली होती. यासाठी त्याला एका महिलेची गरज होती. यामुळे त्याने पिडीत महिलेल्या आपल्याबरोबर काम करण्यासाठी नेले.
काम आटपल्यानंतर आरोपीने पिडीत महिलेला गिरवाई टेकडीवर नेले. यावेळी आरोपीचा एक साथीदार देखील त्याच्यासोबत होता. दोघांनी पिडीतेवर यावेळी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेने ज्यावेळी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या दोघांनी तिला बेदम मारहाण केली.
यानंतर आरोपींनी या महिलेला ठार मारण्याचा उद्देशाने तिच्या अंगावर बाईक घातली. यामुळे पिडीत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. महिला जखमी अवस्थेत आढल्यानंतर गिरवाई टेकडीच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला ग्वाल्हेरच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. यानंतर महिलेने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे.
या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस सध्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”
सैराट फेम आर्ची म्हणते, सगळेच चिञपट ‘सैराट’…
जाणून घ्या! किवी खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ…