कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

मुंबई | कर्नाटकच्या उडपी टोल नाक्यावर ॲम्बुलन्सचा काळाजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला आहे. या अपघाताचा सर्व घटनाक्रम टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टोल नाक्यावर बसलेल्या एका जनावराचा जीव वाचवताना हा अपघात झाल्याचं टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये ॲम्ब्युलन्स भरधाव वेगाने येताना दिसत आहे. टोल नाक्यावर एक जनावर बसले होते. या जनावराचा जीव वाचवण्यासाठी म्ब्युलन्स चालकाने जोरदार ब्रेक मारला.

भरधाव वेगात असलेल्या या ॲम्ब्युलन्सचे बॅलन्स बिघडले आणि ॲम्ब्युलन्स उलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात ॲम्बुलन्स उडाल्याचं दिसत आहे.

या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्राणज्योत रुग्णालयात मालवली. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिकेचा मागचा दरवाजा उघडून काहीजण बाहेर फेकले गेल्याचं व्हिडीओ पाहायला मिळतंय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘उद्धव ठाकरेंनी ‘ती’ मोठी चूक केली’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य 

“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं” 

नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर! 

खासदार नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय