मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कड यांच्यात वाद सुरू आहे. जमिनीच्या व्यवहारात कुटूंबाविरोधात अपमानास्पद टिपण्णी केल्याप्रकरणी केतन कक्कड विरोधात सलमान खानने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
त्यातच आता केतन कक्कडने सलमान खानवर काही धक्कादायक आरोप केले आहेत. सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरण्यात आलेत, असा आरोप केतन कक्कडने केला आहे.
केतन कक्कड हा सलमान खानचा शेजारी असून सलमान खान डि गँगच्या आडोशाने गैरप्रकार करत आहे. तसेच सलमान खानची राजकीय नेत्यांशी जवळीक आहे, असं केतन कक्कड यांनी म्हटलं आहे.
सलमान खानने केतन कक्कडने केलेल्या सर्व आरोपाचं खंडण केलं आहे. केतन कक्कड यांनी युट्युब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली आहे. या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करावं, अशी विनंती सलमान खानने याचिकेद्वारे केली आहे.
या प्रकरणामध्ये ट्विटर, फेसबुक आणि युट्युब आणि गुगलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. सलमान खानच्या या याचिकेवर न्यायाधीश अनिल लद्दाद यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
केतन कक्कडने व्हिडिओ पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून केलेले आरोप खोटे अपमानास्पद आणि बदमानी असून यामुळे सलमान खान आणि त्याच्या कुटूंबाला नाहक त्रासाला सामोर जावं लागत असल्याचा दावा सलमान खानच्या वकिलाने केला आहे.
तसेच केतन कक्कडने केलेल्या आरोपांवर सलमान खाननेही आपली प्रतिक्रीया दिला आहे. हे सर्व आरोप त्यांच्या डोक्यातून आलेले आहेत. यात कोणतही तथ्य नसल्याचं सलमान खानने म्हटलं आहे.
या आरोपांचा कोणताही पुरावा नाही. तुम्ही माझ्या धर्माला मध्ये घेत आहात. माझी आई हिंदू आहे. माझे वडिल मुस्लिम आहेत. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केलं आहे. माझ्या घरात सर्व सण साजरे होतात, असंही सलमान खानने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांची मोठी घोषणा! ‘या’ ग्रामपंचायतीला मिळणार 50 लाखांचं बक्षीस
दारू पाजून, जेवू घालून मेहुण्यानं काढला भाऊजीचा काटा, धक्कादायक कारण समोर
काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कुठून येतो?- संजय राऊत
अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!