समोर आलं धक्कादायक चॅटिंग! दीपिका विचारतेय, “माल है क्या?”, वाचा संपूर्ण चॅटिंग

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आता बॉलिवूड कलाकारांच्या ड्र.ग्ज कनेक्शनपर्यंत येऊन थांबले आहे. एनसीबीच्या चौकशीत अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांची नावे समोर आली आहे.

जया शहा यांच्या मॅनेजर करिष्मा आणि दीपिका पदुकोण यांचे बोलणे झाले होते, अशी माहिती एनसीबीच्या तपासात समोर आली आहे. जया शहा यांच्या व्हाट्स अ‌ॅप चॅटमधून पहिले अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव समोर आले आहे. श्रद्धा जयाकडे सीबीडी ऑयलची मागणी करत होती.

श्रद्धानंतर जया यांच्या मॅनेजर करिष्माच्या व्हाट्स अ‌ॅप चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव समोर आले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना जया शहा आणि करिष्माच्यात ड्र.ग्जबाबत काही चॅट मिळाले आहेत.

जया शहा यांच्या क्वीन कंपनीसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांचे कॉन्ट्रॅक्ट आहे होते. यात दीपिका पदुकोणचेही नाव आहे. या प्रकरणावरून कंगणा राणावतने दीपिका पदुकोणवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

कंगणा म्हणाली, “डिप्रेशनमुळे नशा करणे हा एक वाईट परिणाम आहे. काही बड्या सोसायटीतील श्रीमंत स्टार किड्स यांना चांगले संस्कार असतात, असा दावा करतात आणि आता हेच आपल्या मॅनेजरला विचारतात की, माल आहे का?”

एनसीबीच्या हाती एक महत्त्वाची गोष्ट लागली आहे. त्यांना काही व्हाट्स अ‌ॅप चॅट मिळाले आहे. त्यात डी एन एस के अशी अक्षरं आहेत. डी म्हणजे दीपिका पदुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिष्मा अशी नावे समोर आली आहेत.

दीपिका पदुकोण आणि करिष्मा यांच्यात ड्र.ग्जबाबत बोलणे झाले आहे, ही माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. दीपिका करिष्माला विचारते, तुमच्याकडे माल आहे का? याला करिष्माने उत्तर दिले, हो..पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे.

यामध्ये करिष्मा कोणीतरी अमित या व्यक्तीचे नाव घेऊन बोलत होती, अमितला पाठवू शकते. यावर दीपिकाने उत्तर दिले, हो… त्यानंतर काही वेळाने करिष्मा म्हणाली, अमित घेऊन चालला आहे. यावर दीपिका विचारते, हैश आहे ना? मग करिष्मा म्हणते, हैश नाही. गांजा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रियाची आता लवकर सुटका नाही; न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय

मणिकर्णिका फिल्म का सोडली?, सोनू सूदनं कंगणा राणावतबद्दल केला धक्कादायक खुलासा!

मोदी सरकारची मनमाची चालू देणार नाही; ‘या’ कारणामुळं शरद पवारांनी धरला उपवास!

…म्हणून रतन टाटांनी ‘या’ गाडीला दिलं चक्क कामगाराचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी!

‘क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर…’; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं