औरंगाबाद | कोरोनाकाळात देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच आता औरंगाबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
20 वर्षीय तरुणी आपल्या दिनेश मोरे नावाच्या मित्रासोबत भांगसिमाता गडावर फिरायला गेली होती. ते दोघे सायंकाळच्या वेळी गडावर एका जागी गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक दोन अज्ञात व्यक्ती आले आणि काहीही विचारपूस न करता या दोघांना मारहाण करू लागले.
तरुणीच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी देत नराधमांनी तिला शेजारच्या खड्यात नेलं. यावेळी तरुणीनं नराधमांसमोर हात जोडले गयावया केली मात्र, तरीही नराधमांनी तीच काहीही ऐकल नाही आणि तिच्यावर बलात्कार केला.
तरूणीनं याप्रकरणी दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दौलताबाद पोलिसांनी एका संशयितला ताब्यात घेतलं होत मात्र लघुशंकेच कारण सांगत हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून गेला आहे. पोलीस सध्या आरोपींचा तपास घेत आहेत. भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या; गेल्या 48 तासांत दुसरा हल्ला!
हजारोंचं जीवन उद्धवस्त करणाऱ्या पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे सावट
‘मी आजही संयम ठेवलेला आहे’, संयम सुटला तर काय कराल?; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट
पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला