धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली | छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बाॅसचे नवीन घर, नवीन सीझन, नवीन, स्पर्धक, नवीन सूत्रसंचालक या सीझनची उत्सूकता वाढवत आहेत. यावेळी सलमान खान नाही तर दिग्दर्शक, निर्माता करण जोहर सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहे. अशातच सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात भांडण झालं असून एका स्पर्धकाला बिस बाॅसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

बुधवारी प्रसारित झालेल्या बिग बॉस ओटीटीच्या भागामध्ये जीशान खानला अचानकपणे घराबाहेर काढण्यात आलं. कारण एका टास्कमध्ये प्रतिक सहजपाल आणि निशांत भट्ट यांच्यासोबत जीशानचं भांडण झालं. एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये चक्क हाणामारीही झाली. त्यामुळे जीशानला तातडीने घराच्या बाहेर काढण्यात आलं.

जीशानला घरातून बाहेर काढल्यानंतर त्यानं सोशल मीडियावर त्याला झालेल्या दुखापतीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे पाहता त्याच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. जीशानला पुन्हा बिग बाॅसच्या घरात घेण्याची मागणीही चाहत्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे.

जीशाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या अंगावर असलेले निशान दाखवले आहेत. त्याच्या मानेवर आणि हातावर हे निशान दिसत आहेत. जीशनला घराच्या बाहेर काढल्यामुळे त्याच्या चाहते नाराज झाले आहेत. इतकेच नाही तर ट्विटरवर देखील जीशानला न्याय दिला जावा, अशी मागणी होताना पाहायला मिळाली.

बिग बाॅसच्या घरात सातत्यानं कुणाना कुणा स्पर्धकांमध्ये वाद, भांडाभांडी होत असते. परंतु आता हे वाद ही भांडणे आता हिंसक झाली असून स्पर्धकांमध्ये आता चक्क हाणामारी होऊ लागली आहे. त्यामुळे बिग बाॅसनं हा निर्णय घेतला आहे.

बिग बाॅसच्या घरामध्ये हाणामारीला परवानगी नाही. घराच्या आतमध्ये कुणाही स्पर्धकाने कुणावरही हात उचलण्यास मनाई आहे. त्यामुळेच जीशानला तातडीने घराच्याबाहेर काढण्यात आलं.

 जीशानच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. आता या वादावर पुढे काय होईल, काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/CS_-2LpC9sY/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!

खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!

कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!

आता अलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज

बाॅयकाॅटनंतर पुन्हा एकदा राधिकाचा बोल्ड लूक; सोशल मीडियाचं तापमान वाढवलं